धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास एक ट्रक खताने भरलेला कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घटनास्थळी पोहचले असता. ट्रकचा चालक क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाल आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळी ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना मिळून आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्या गाडीचा चालकासह क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाला होता त्यांनी त्यानंतर त्यांनी पिकअप वरील चालकाला खतांची गोणी कोणत्या शेतकऱ्याकडे घेऊन जात असल्याचे विचारले असता, त्याला काहीही सांगता आले नाही. त्यामुळे आता ट्रक मालकाची वाट बघितली जात असून त्यांच्याकडे संबंधित खताशी निगडीत काही पावत्या असल्याची त्याची खात्री केली जाईल. ट्रक मालक समोर येत नाही, तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही. गेल्या काही दिवसा आधी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरीना आवाहन केले होते कि, बोगस बियाण्यापासून सावधान रहा त्यानंतर तालुक्यात झालेली हि कारवाई मोठी मानली जात आहे.