Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील चार पोलीस अधिकारींच्या बदल्या !
    क्राईम

    जिल्ह्यातील चार पोलीस अधिकारींच्या बदल्या !

    editor deskBy editor deskMay 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यातील ४ बड्या अधिकारीची सोमवारी उशिरा पोलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्ह्यामध्ये तीन अधिकारी नव्याने येणार आहेत.

    सोमवारी काढण्यात आलेल्या बदल्यांच्या आदेशामुळे राज्यभरातील १०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. यांना तातडीने रुजू होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे. बदल्यानमध्ये जळगावचे डीवायएसपी संदीप गावित यांची पाचोरा विभागात बदली करण्यात आली आहे. राकेश जाधव यांची अमळनेर येथून जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे.
    आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी भास्कर डेरे यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे तर भुसावळचे डॅशिंग डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेरच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बदली झाली आहे. याशिवाय मुक्ताईनगर येथे डीवायएसपी म्हणून राजकुमार शिंदे हे बदलून येत आहेत तर जळगावच्या संदीप गावित यांच्या जागी चंद्रपूर येथील डीवायएसपी सुशीलकुमार नायक येत आहेत. सोमनाथ वाकचौरे यांच्या जागी भुसावळ डीवायएसपी म्हणून विक्रांत गायकवाड येणार आहेत. बदल्यांमुळे पोलीस दलामध्ये नवीन शिस्त व बदल आगामी काळात बघायला मिळणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ५३ वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ !

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.