Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राणे पुत्राने ठाकरेंवर डागली तोफ !
    राजकारण

    राणे पुत्राने ठाकरेंवर डागली तोफ !

    editor deskBy editor deskMay 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    राज्यातील ठाकरे व भाजप मध्ये सुरु असलेले वाक्ययुद्ध पुन्हा एकदा सुरु झाले आहे. नुकतेच त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाद्वारासमोर धूप दाखविण्याचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंदिरात जात महाआरती करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितेश राणेंच्या दौऱ्या पूर्वी त्रंबकेश्वरमध्ये मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तिथे बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीय.

    संजय राऊत टेबल पत्रकार आहेत. त्यांना किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. तुझ्या मालकाने नवीन मातोश्री का बांधली? देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच वर्षाच्या काळात बाळासाहेबांचे स्मारक तरी बांधू शकले का बाळासाहेबांनी सांगितलं आहे की, काँग्रेस समोर झुकणारे हिXX असतात. मग आता तुम्ही काय करताय?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. मी काय राज ठाकरे यांना क्रॉस करणार नाही. तिथे स्पष्ट लिहिलं आहे की, हिंदू शिवाय इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणी ढवळाढवळ करू नये. आमचा आजचा दौरा गावकऱ्यांच्या इच्छेनुसार लागला आहे. ज्यांचा विरोध आहे, त्यांनी सोबत यावं आणि भूमिका मांडावी, असं नितेश राणे म्हणालेत.

    मी त्र्यंबकेश्वर मंदिरात आरती करायला चाललो आहे. धर्मामध्ये आरती करणं, आमची जबाबदारी आहे. हक्क आहे. धर्मावर होणारे अन्याय आम्ही थांबवू शकले नाही तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी महाआरती करणार आहे. तिकडे येणाऱ्यांच्या संख्येपेक्षा भावना महत्त्वाची आहे. हे आक्रमण हिंदू धर्माच्या विरोधात होत आहे. जे काही हल्ले आमच्या हिंदू धर्मावरती होत आहे ते थांबवण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत, असं नितेश राणे म्हणालेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.