लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीची आशा धूसर झाली आहे मात्र भाजपा 21 जागांवर अर्ज भरणार असे आमदार गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी तीनदा बैठका होऊन देखील काहीच निष्कर्ष निघाला नसतांनाच कॉंग्रेसने महाविकास आघाडीची मागणी केली आहे. यामुळे आज भाजपच्या मॅरेथॉन बैठकीनंतर स्वबळाची तयारी करण्याचे ठरविण्यात आले. आ. गिरीश महाजन यांनी याबाबत घोषणा करतांना उद्या सर्व उमेदवार अर्ज भरणार असल्याचे सांगितले.
गेल्या वेळेस प्रमाणे यावर्षीही जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय आघाडी पॅनलचे निर्मिती व्हावी असे प्रयत्न पालक मंत्री गुलाबराव पाटील हे करीत होते गाणे कोर कमिटी या तीन वेळेस बैठका होणे निष्कर्ष काही निघाला नाही काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेत भाजपा बरोबर जाण्यास नकार दिल्याने सर्व पक्ष आधारित बनणार नाही हे चित्र स्पष्ट झाले होते.
त्यामुळे आज अजिंठा विश्रामगृह येथे आमदार गिरीश महाजन राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत भाजपाची बैठक घेण्यात आली यावेळी खासदार उमेश पाटील खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकारे आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार स्मिता वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की जिल्ह्याच्या हितासाठी सर्व पक्ष आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न होता उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपा 21 जागांवर अर्ज भरणार आहे मात्र माघारी पर्यंत वेळ असल्याने पुढे काय होते ते बघू असे ते म्हणाले काँग्रेसने वेगळा सूर लावलेला दिसला तर राष्ट्रवादीकडून पाहिजे तसा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला नाही. यामुळे भाजपने स्वबळाची तयारी केली असून उद्या आमचे २१ उमेदवार हे सर्व जागांवर अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात दोन्ही खासदारांचा समावेश असेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सर्वपक्षीय पॅनलची आशा अद्यापही पूर्णपणे मावळली नसली तरी आम्ही स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचे आ. गिरीश महाजन यांनी आवर्जून नमूद केले.