धरणगाव : प्रतिनिधी
एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक पार पडली आहे. यात सहकार गटाला मोठे यश मिळाले आहे. तब्बल २० वर्षापासून या शेतकरी सहकारी संघात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सत्ता होती ती त्यांनी आज देखील कायम ठेवली आहे.
धरणगाव-एरंडोल कृषी उत्त्पन्न बाजार समितीत शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर लागलीच लागलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत त्यांचे सहकार गटाचे तब्बल १५ उमेदवार निवडून आले आहे. यात संजय जाधव,गजानन पाटील, धनराज महाजन, सुमनबाई पाटील, प्रकाश महाजन, पवन सोनवणे, भगवंतराव पाटील हे विजयी झाले आहे.
हि निवडणूक जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन, खा.उन्मेष पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.राजूमामा भोळे, भाजपचे नेते पी.सी.आबा पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली झाली आहे.