धरणगाव : प्रतिनिधी
गावकऱ्यांनी काम करणाऱ्यांच्या पाठीशी एकजुटीने राहून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करून घ्यावा तसेच जलजीवन मिशन अंतर्गत गावाच्या सुमारे 65 लाखाची मंजूर पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून त्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, नागरिकांनी वाढत्या तापमानामुळे पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार हे होते.
यावेळी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धार येथे 65 लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून या पा. पु. योजनेचा शुभारंभ आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला.
सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरून चोरगाव येथील विहिरीवरून पाईपलाईन द्वारे धार गावाला पाणीपुरवठा होणार आहे. सदर योजनेत गावं अंतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी, अनुषंगिक बाबींचा समावेश आहे.यावेळी ना. गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत, वि.का. सोसायटी व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.
यावेळी मागासवर्गीय सेनेचे तालुकाध्यक्ष दीपक सावळे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, गावचे सरपंच मिलिंद पाटील, उपसरपंच सौरभ पाचपोळ, ग्रामसेविका विद्या बेडसे, ग्रा. पं. सदस्य उदयभान सोनवणे, बाळू पाटील, मुरलीधर पाटील, दादू पाटील, भिलाभाऊ सोनवणे, अमोल पाटील, लखीचंद पाचपोळ, ललित पाचपोळ, यांच्यासह शिवसेना – युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपसरपंच सौरभ पाचपोळ यांनी केले तर आभार मागासवर्गीय सेनेचे तालुकाध्यक्ष दीपक सावळे यांनी मांनले.