शेगाव : वृत्तसंस्था
पंढरपुर येथे देवदर्शन करण्यासाठी शेगावातील काही भाविक गेले होते. तेथून घराकडे परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे शेगावत देशमुख पेट्रोल पंपाजवळ वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पिल्लरवर धडकले. या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू तर ७ गंभीर भाविक जखमी झाले आहेत. यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याअसल्याने त्यांना अकोल्यात हलविण्यात आले.
पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी शेगावातील काही गेले होते. परतत असताना भाविकांच्या वाहनाला शेगावात मोठा अपघात घडला. आज सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारा वर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार तर ७ भावीक गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलवण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झल्याचेचे समजते.रात्री पासून हा प्रवास सुरु होता. आणि अगदी त्यांच्या घरापासून फक्त २ किलो मीटर अंतर बाकी होते.