रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील बापाने आपल्या १३ वर्षीय मुलीसोबत चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून सावदा पोलिसात बापाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह राहायला असलेल्या १३ वर्षीय मुलगी दि २१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरात भांडी घासत असतांना घरात असलेल्या बापाने मुलीस बळजबरीने ओढून तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार सावदा पोलिसात सांगितल्याने आरोपी बापाविरोधात अत्यचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.