जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेचा एका इसमाने घरात घुसून अत्याचार केल्याची घटना दि २१ रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह राहायला आहे. दि २० रोजी रात्रीच्या सुमारास गावातील एक इसम महिलेच्या घरात प्रवेश करीत घराचे दार आतून बंद करीत महिलेशी जबरदस्ती करू लागला यावेळी महिलेने आरडा ओरड करण्यास सुरुवात केल्याने महिलेचे तोंड दाबून महिलेच्या मनाविरुद्ध तिच्यासोबत चुकीचे कृत्य केले व सदर प्रकार जर कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या मुलाला मारून टाकेल अशी धमकी देत समाजात तुझी बदनामी देखील करेल असे आरोपींनी धमकी दिली. महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी पहूर पोलिसात धाव घेत गावातील एका इसमाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.