चोपडा : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस राहत्या घरातून पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील एका परिसरात १५ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासोबत राहायला आहे. दि १६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असतांना अनोळखी इसमाने मुलीस काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील सदस्यांनी अनेक ठिकाणी या मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने त्यांनी चोपडा शहर पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि.संतोष चव्हाण हे करीत आहेत.