• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरे गटाने दिले शिंदे गटाला ‘ओपन चॅलेंज’ ; राजकीय वाद पेटणार ?

editor desk by editor desk
May 21, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
ठाकरे गटाने दिले शिंदे गटाला ‘ओपन चॅलेंज’ ; राजकीय वाद पेटणार ?

बीड : वृत्तसंस्था 

मविआ सरकार सत्तेत आल्यापासून ते मविआ सरकार पडेपर्यंत संजय राऊत सातत्याने भाजपावर टीका करताना दिसले. त्यानंतर शिंदे गट वेगळ्या झाल्यावर त्यांच्यावरही राऊतांनी वेळोवेळी तोफ डागली. आम्ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहोत, असे संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही म्हणताना दिसतात. तशातच आज, बीडच्या जाहीर सभेत संजय राऊतांनी तुफान आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाला एक ‘ओपन चॅलेंज’ दिलं.

“आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तु्म्ही मते मागितलीत. असं अजिबात नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे हे १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत. कर्नाटकात मोदींनी ३६ जाहीर सभा घेतल्या, २७ रोड शो केले, पण जिथे जिथे मोदींनी सभा घेतल्या त्या सर्व ठिकाणी भाजपाचा पराभव झाला. यावेळीही भाजपाने मोदींचे फोटो लावले होते, स्वत: मोदीही फिरले होते. मग पराभव का झाला? आता आमच्याकडून ४० ‘मिंधे’ गेले आहेत, त्यांनी मोदींचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं, राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे नाव सांगणार नाही”, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना दिले.

“जे लोक आम्हाला सांगत आहेत की आम्ही मोदींच्या फोटोंवर निवडून आलो, त्या लोकांना मी सांगतो की, आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो, तुम्ही मोदी-शाहांचा फोटो लावा. मग तुम्हालाही कळेल की महाराष्ट्र काय आहे, मराठी माणूस काय आहे आणि हिंदुत्व काय आहे. या महाराष्ट्राचं वातावरण झपाट्याने बदलत आहे. लोकांच्या मनात चीड आहे, संताप आहे. लोकं निवडणुकीची वाट पाहत आहेत. कधी एकदा निवडणुकीला सामोरे जातोय आणि या सरकारला खऱ्या अर्थाने ‘डिसमिस’ करतोय अशी लोकांची भावना आहे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपाचा समाचार घेतला.

Tags: #cmshinde#shivsena#udhavthaakr
Previous Post

शिरसोलीत १७ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल !

Next Post

लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group