• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वाढदिवसाच्या दिवशीच कुलरचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू !

editor desk by editor desk
May 21, 2023
in क्राईम, मुक्ताईनगर
0
वाढदिवसाच्या दिवशीच कुलरचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

शहरात वाढदिवसाच्या दिवशीच कुलरचा शॉक लागून वैष्णवीचा मृत्यू झाला. यामुळे अनेकांची मने हेलावली, डोळे पाणावले, कोवळ्या वयातच एक्झिट घेतली. पण तिचे मरणोत्तर नेत्रदान करून अंधकार असलेल्या गरजूंच्या जीवनात प्रकाश देण्याचा आदर्श तिच्या आई- वडिलांनी समाजासमोर उभा केला आहे.

शुक्रवारी वाढदिवसाची तयारी सुरू असताना वैष्णवी चेतन सनान्से (९) हिला कुलरचा शॉक लागला. आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने सनान्से परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. वैष्णवीच्या वाढदिवसाच्या रुपाने आनंदोत्सवच जणू साजरा होणार होता, परंतु तेथे शोककळा पसरली. अशा कठीण समयी वडील चेतन सनान्से, काका लखन सनान्से यांनी वैष्णवीचे मरणोत्तर नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लागलीच जळगाव येथील मांगीलालजी बाफना नेत्रपेढीशी संपर्क साधून वैष्णवीचे नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. नेत्र पेढीचे पथक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि मृत्यूनंतर अवघ्या चार तासांच्या आत वैष्णवीचे नेत्रदान झाले. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. योगेश राणे यांनी सांगितले की, अगदी वेळेवर निर्णय घेऊन वैष्णवीच्या पालकांनी तिचे नेत्रदान घडविले.
एकीकडे सनान्से परिवारावर आभाळ कोसळले असताना त्यांनी वेळेवर वैष्णवीचे मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ती जगात नसली तरी तिच्या डोळ्यांतून अंधकार पसरलेल्या गरजूंच्या जीवनात प्रकाश पडेल आणि त्याला जगण्याचा आनंद मिळणार आहे. मुळात सनान्से परिवार हा आध्यत्मिक आहे. सलून व्यवसायापाठोपाठ फेटेवाले म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वैष्णवीचे वडील चेतन महाराज अंत्यविधीसमयी भजनी मंडळातही काम करतात…

Previous Post

विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !

Next Post

शिरसोलीत १७ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल !

Next Post
शिरसोलीत १७ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल !

शिरसोलीत १७ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group