Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीने केला पत्नीवर अॅसिड हल्ला अन प्रियकरावर…
    क्राईम

    प्रेयसीने केला पत्नीवर अॅसिड हल्ला अन प्रियकरावर…

    editor deskBy editor deskMay 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    एका ब्युटीशियनने तिच्या विवाहित प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तिच्या प्रियकरावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हि घटना भोपाल जिल्ह्यात घडली आहे.

    दुसरीकडे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पतीनेही प्रेयसीवर अॅसिड हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने तिला पाच वर्षे लिव्ह इनमध्ये ठेवल्याचा आरोप ब्युटीशियनने केला आहे. प्रेयसी 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप प्रियकराने केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. ग्वाल्हेरच्या जनकगंज पोलीस स्टेशनच्या राम दवारा भागात राहणाऱ्या 32 वर्षीय श्वेता बन्सल यांच्यावर संजय नगर भागातील एका 34 वर्षीय ब्युटीशियनने हल्ला केला. 18 मे रोजी दुपारी 3 वाजता घडलेल्या या घटनेत श्वेता गंभीर जखमी झाली होती. तिला वाचवताना पती अमित बन्सलही भाजला. अपघातानंतर अमितने पत्नी श्वेता हिला खासगी रुग्णालयात दाखल केलं.

    अमित आणि श्वेता यांनी सांगितलं की, ब्युटीशियन त्यांना 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत आहे. अमितने 19 मे रोजी दुपारी 2 वाजता जनकगंज पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपी ब्युटीशियनविरुद्ध अॅसिड हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली. 18 मे रोजी दुपारी 3 वाजता विवाहित प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला झाल्यानंतर, 8 वाजता ब्युटीशियनने जनकगंज पोलीस ठाण्यात जाऊन अमितवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ब्युटीशियनने एफआयआरमध्ये सांगितलं की, अमितने तिच्याशी मैत्री केली आणि नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

    तिने आरोप केला आहे, की अमितने तिला 23 मे 2019 ते 15 मे 2023 पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ठेवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान त्याने लग्नाचं वचनही दिलं, पण लग्न केलं नाही. काही दिवसांपूर्वी अमितने फसवणूक करून तिला फ्लॅट रिकामा करायला लावला. ब्युटीशियनचा आरोप आहे, की ती अमितशी बोलण्यासाठी त्याच्या घरी गेली होती, पण तिने अॅसिड फेकलं नाही. तिला या प्रकरणात गोवण्यासाठी अॅसिड हल्ल्याची घटना घडवली आहे. ब्युटीशियनच्या तक्रारीवरून जनकगंज पोलिसांनी आधी रात्री 8 वाजता अमित बन्सलवर बलात्काराचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर पहाटे अडीच वाजता अमित बन्सल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि ब्युटीशियनवर अॅसिड हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला. लष्कर सर्कलचे सीएसपी केएम शियाज यांनी सांगितलं की, प्रेयसीच्या वतीने बलात्काराचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी प्रियकराने पत्नीवर अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी प्रेयसीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दोन्ही एफआयआरमधील तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ५३ वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ !

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.