जळगाव प्रतिनिधी: मोटर सायकलने भजेगल्लीतून जात असतांना दोन अनोळखी आरोपी यांनी त्यांच्या मोटर सायकलवर मागून येऊन शर्टाचे खिशातील मोबाईल हिसकावून पळून गेले होते याप्रकरणी सीसीटीव्ही च्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्याच्या मोबाईल जप्त करण्यात आला आहे न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे .
अविनाश रामदास खैरनार रा .प्रतापनगर जळगाव हे 14 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटर सायकलने भजेगल्लीतून जात असतांना दोन अनोळखी आरोपी त्यांची मोटर सायकलवर मागून येऊन फिर्यादीची शर्टाचे खिशातील मोबाईल हिसकावून पळून गेले होते, अविनाश खैरनार याच्या फिर्याद वरून जिल्हापेठ पो स्टे ला गुन्हा दाखल झाला होता. निरीक्षक रामदास वाकोडे यांनी हे कॉ शरीफ शेख यांनी लागलीच घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमी वरून आरोपी पवन विनोद साळवी 21 वर्ष रा अयोध्यानगर जळगाव,आकाश सदाशिव पाटील 23 वर्ष रा मुक्ताईनगर यांना निष्पन्न करून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल क्र MH 19 BZ 1988 सह ताब्यात घेऊन जबरीने चोरून नेलेला मोबाईल रेड मी कंपनीचा पांढरे रंगाचा तपासात आरोपींना अटक केली.
न्यायमूर्ती श्री मुगलीकर यांचे समक्ष हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली . या कालावधीत 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल मुद्देमाल जप्त केलेला आहे,आरोपींनी गुन्हा केलेची कबुली सुद्धा दिलेली आहे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आयपीएस चिंता ,पो नि रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली हे कॉ शरीफ शेख,पो ना सलीम तडवी,पो कॉ रवींद्र सपकाळे,पो कॉ विकास पाहुरकर,पो कॉ विनोद पाटील यांनी केला आहे.