Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला नेत्याला ठाकरे गटाच्या पदाधिकारीने दोन लगावल्या !
    क्राईम

    महिला नेत्याला ठाकरे गटाच्या पदाधिकारीने दोन लगावल्या !

    editor deskBy editor deskMay 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील ठाकरे गट सध्या भाजप व शिंदे गटाला निशाण्यावर धरत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र करीत असल्याचे गेल्या काही महिन्यापासून दिसत आहे. तर आता ठाकरे गटातील नेत्या व पदाधिकारीमध्ये वाद पेटल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

    बीड‎ शिवसेना ठाकरे गटाचे‎ जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव‎ यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून‎ ‎ ‘होय, मी सुषमा‎ ‎ अंधारेंच्या दोन‎ ‎ कानशिलात‎ ‎ लगावल्या, त्या‎ ‎ कार्यकर्त्यांकडून‎ ‎ पैसे मागत‎ ‎ आहेत, माझे‎ ‎ पद विक्री‎ करायला निघाल्या आहेत,’ असा‎ आरोप केला. अंधारे यांनी मात्र‎ मारहाणीचा दावा फेटाळला आहे.‎ बीडमध्ये २० मे रोजी‎ शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची‎ ग्रामीण महाराष्ट्राची समारोप सभा‎ आहे. खा. संजय राऊत, सुषमा‎ अंधारे यांची या सभेला उपस्थिती‎ ‎ ‎ असणार आहे. याची तयारी सध्या‎ सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी सुषमा‎ अंधारे या सभेच्या मैदानाची व‎ तयारीची पाहणी करत असताना‎ जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व‎ अंधारे यांच्यात वाद झाला. स्वतः‎ जाधव यांनी याबाबत एक‎ व्हिडिओ केला आहे.

    जाधव‎ म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून‎ सुषमा अंधारे येथील कार्यकर्त्यांना‎ ‎ब्लॅकमेल करून विविध वस्तू‎ मागत आहेत. त्यांच्या परळीतील‎ कार्यालयासाठी अनेक‎ कार्यकर्त्यांनी लेकराबाळाच्या‎ तोंडातला घास काढून त्यांना‎ विविध वस्तू दिल्या. आम्ही काही‎ देण्यास नकार दिला की आमचे‎ निगेटिव्ह वार्तांकन उद्धव‎ साहेबांकडे करीत होत्या.‎ यासंदर्भात मी स्वतः उद्धव‎ साहेबांना थेट बोललो. त्यांच्या‎ अशा वागणुकीच्या तक्रारीदेखील‎ केल्या. मात्र तरीही अंधारे यांचा हा‎ प्रकार सुरूच होता. आज सभा‎ स्टेजची पाहणी करण्यासाठी‎ आम्ही जेव्हा गेलो त्या वेळी अंधारे‎ यांना मी बाजूला घेऊन या‎ प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांना‎ मी म्हणालो, तुम्ही असे पैसे घेऊन‎ किंमत नसलेल्या कार्यकर्त्यांना का‎ पदे वाटत आहात? त्यावरून‎ त्यांची आणि माझी बाचाबाची‎ झाली. त्यामुळे रागाच्या भरात मी‎ त्यांच्या कानाखाली ठेवून दिली. या‎ प्रकारानंतर अप्पासाहेब जाधव‎ आणि उपजिल्हाप्रमुख गणेश‎ वरेकर यांच्यातही बाचाबाची‎ झाली. त्यात वरेकर यांनी‎ अप्पासाहेब जाधव यांची स्कॉर्पिओ‎ गाडी फोडली.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.