• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विधिवत पूजा करून रथोत्सव उत्साहात  साजरा !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 17, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
विधिवत पूजा करून रथोत्सव उत्साहात  साजरा !



प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी निघणारा रथोत्सव मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनामुळे स्थगित केला गेला होता. रथोत्सवाची परंपरा अखंड चालू राहावी रथाची मिरवणूक रद्द करून रथाची विधिवत पूजा  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन  रधोत्सव साजरा करण्यात आला.

अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी धरणगाव येथे रथत्सव साजरा होतो .या रथावर श्री बालाजी भगवानांना विराजमान करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष श्री व सौ निलेश चौधरी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, पी. आय. शंकर शेळके, बांधकाम अभियंता ठाकूर, धानोऱ्याचे सरपंच भगवान महाजन, उपनगराध्यक्ष विलास महाजन, विलास येवले, शाम भाटीया , पत्रकार बी. एन. चौधरी, आर. डी. महाजन, डी. एस. पाटील, कडू रूपा महाजन, लक्ष्मण माळी, धर्मराज मोरे, विजयकुमार शुक्ला, बी. आर. महाजन यांच्या हस्ते मंदिर प्रांगणात आरती करण्यात आली. त्यानंतर रथ 10 फूट ओढला गेला व लगेच पूर्ववत जागेवर आणला .

यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायजेशन या गोष्टी कटाक्षाने पाळल्या गेल्या.

रथाची सजावट, रोषणाई करून, जागेवर भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. भक्तांनी नियमांचे पालन करून श्री बालाजी भगवानांचे दर्शन घेतले.

मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी. आर. पाटील , उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जीर्णोद्धार समिती प्रमुख जीवनसिंह बयस, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी, अशोक येवले, ध्रृवसिंग बयस, किरण वाणी, शैलेश भाटिया, रवींद्र काबरा, हेमलाल भाटिया, भास्कर मराठे यांच्यासोबत मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. गावातील सर्व पक्षीय नेते, सर्व समाजातील प्रतिष्ठित उपस्थित होते. बापू पुराणिक, गणेश पुराणिक यांनी पूजा केली.

Previous Post

साई संकल्प मोटर्सचे दिमाखात उदघाटन !

Next Post

मोबाईल चोरटे मुद्देमलासह जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात

Next Post
मोबाईल चोरटे मुद्देमलासह जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात

मोबाईल चोरटे मुद्देमलासह जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group