मुंबई : वृत्तसंस्था
आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये सोने आणि चांदी दोन्ही लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. गुरुवारी म्हणजेच 18 मे रोजी सोने 60,100 रुपयांवर उघडले. यानंतर त्यात थोडीशी घसरण दिसून आली. सकाळी 11.30 वाजेपर्यंत ते 60085 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. काल ते60145 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण होत आहे. मार्केट उघडल्यानंतर चांदीचा भाव 72,555 रुपये प्रति किलोवर होता. सकाळी 11.30 वाजेपर्यंत 173 रुपये किंवा 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 72,485 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. काल वायदे बाजारात चांदी 72,658 रुपये प्रति किलोवर बंद झाली. मुंबईत आज 22 कॅरेट सोनं 56,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर नवी दिल्लीत 22 कॅरेट सोनं 56,450 रुपये प्रति ग्रॅम आहे.