कजगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाटेमुळे तापमानाचा पारा या आठवड्यात अधिक वाढला आहे. यामुळे उष्माघाताने तीन दिवसात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कजगाव येथील तरुण अक्षय रत्नाकर सोनार (वय २९) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
राजस्थान कडील गरम वाऱ्यांमुळे जळगाव जिल्ह्यात राज्यासह उष्णतेची लाट आहे. त्यातच वाढत्याच शनिवारी (ता.१३) संध्याकाळी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला मुलगा होता. अक्षयच्या मागे दीड वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.