मुंबई : वृत्तसंस्था
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. सोळा आमदारांच्या अपात्रते बाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा यासाठी ठाकरे झाला असून ते आज विधानसभा अध्यक्षांना 79 पानांची निवेदन देणार आहे, अशी माहिती विश्वासनीय सुत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकालावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे आक्रमक झाले असून. बेकायदेशीर पद्धतीने तयार झालेले सरकारवर न्यायालयाने ठपका ठेवलेला आहे. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा याबाबत ही निर्णय दिलेला आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर यावर प्रक्रिया करावी असा जोर आता उद्धव ठाकरे गटाने लावला आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष यांच्या सचिवांना ठाकरे गट भेटणार असून याबाबत पत्र देणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष यांनाही ७९ पानांचे निवेदन देणार आहे. या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची सर्व तपशील असणार आहे.