धरणगाव : प्रतिनिधी
राज्यातील अनेक ग्रामपंचायतीमधील लोकनियुक्त सरपंचाचा कार्यकाळ संपलेला आहे. या सरपंचानी गावासाठी अनेक कामे केली आहे. त्यामुळे नक्कीच या सरपंचान गावातील ग्रामस्थाचा मोठा पाठींबा असल्याने सरपंच ज्या दिवशी त्यांचा कार्यकाळ संपत आहे. यादिवशी ते भावूक देखील झाल्याचे दिसले आहे. पण यात चर्चा मात्र एकाच सरपंचाची होत आहे. त्याने थेट गावातील मुख्य चौकात जर माझ्याकडून काही चूक झाली असेल किवा नकळत तुमचे मन दुखले गेले असेल तर मोठ्या मनाने माफ करा असे फलक झळकल्याने राज्यातील अनेक गावामध्ये हे फलक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातील लोकनियुक्त सरपंच सचिन जगन्नाथ पवार हे मागील निवडणुकीत ग्रामस्थांनी त्यांना निवडून दिले होते. त्यांनी या गावासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मध्यातून अनेक निधी आणून गावाचा चेहरा मोहरा बदलवून टाकला आहे. तरी सुद्धा त्यांनी हे फलक लावून ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त केल्याने हे फलक चर्चेचा विषय बनला आहे.
काय आहे फलकातील मजकूर ?
आभार। आभार आभार
माझ गाव माझा अभिमान
प्रिय गावकऱ्यांनो आपल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला असून गेले पाच वर्षे आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल व दिलेल्या प्रेमाबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप। आभार मानतो
आपण सर्वांनी मला मागील पंचवार्षिक ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच पदी मोठ्या मताधिक्याने निवडून माझा.आता माझा कार्यकाळ संपला असल्याने या पंचवार्षिकमध्ये मी सरपंच पदाला न्याय देण्याचा पुरेपर प्रयत्न केलेला आहे. आपल्या गावातील जवळजवळ सर्व विकासकामे मी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या गावातील झालेल्या विकास कामांमध्ये माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच आपल्या गावातील सर्व नागरिकांचा व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांचा मी खूप खूप आभारी आहे आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे व सहकार्यामुळेच मी ही पाच वर्षे यशस्वीपणे काम करू शकलो. कळत नकळत माझ्याकडून कोणाचे मन दुखावले असेल तर आपण मोठ्या मनाने मला माफ करावे ही नम्र विनंती.
आपलाच
सचिन जगन्नाथ पवार
माजी लोकनियुक्त सरपंचचांदसर