रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील ३१ वर्षीय महिला घराबाहेर कपडे धूत असतांना दोन इसमांनी जवळ येत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोघाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात ३१ वर्षीय महिला आपल्या परिवारासोबत रहायला आहे. दि १० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला घरी एकटी असतांना घराच्या ओट्यावर कपडे धूत असतांना गावातील दोन इसम या ठिकाणी येत महिलेजवळ उभे राहिल्याने महिलेणे सांगितले कि कपड्याचे पाणी तुमच्या अंगावर उडेल त्यामुळे तुम्ही दूर जा त्यांनी उलट महिलेला बोलले कि, तु काही माधुरी दीक्षित आहे का ? तुला एक दिवस उचलून घेवून जावू असे तर संशयित आरोपींनी महिलेला शिवीगाळ करीत हि बाब जर तु कुणाला सांगितली तर तुला जिवंत ठेवणार नाही असे देखील म्हणाल्याने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली या प्रकरणी महिलेने थेट राववर पोलिसात धाव घेत दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.सतीश सानप हे करीत आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.