रावेर : बऱ्हाणपूर जवळील लालबाग येथील अभियंताचे बराणपुर येथील ब्युटी पार्लरच्या शिक्षणासाठी पुणे येथे गेलेल्या युवतीशी प्रेम जडले. प्रेयसीसोबत आंतरजातीय लग्न केले. तिला अंधारात ठेवत महिन्याभरातच जातीच्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या पतीचा साखरपुड्याचे वायरल फोटो बघतात विवाहाचा डाव पत्नीने पोलिसांच्या मदतीने हाणून पाडल्याची घटना रावेर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील लालबाग येथील अभियांत्रिकीचा पदवीधर युवक व बऱ्हाणपूर शहरातील ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे येथे गेलेल्या मुलीचे एकमेकांवर प्रेम जडले. महिनाभरापूर्वी आळंदीच्या वैदिक पद्धतीने विवाहबद्ध झाले. महिनाभरात या विद्युत अभियंत्याने पत्नीकडून चार लाख रुपये उकळले. तिला काहीही कळून देत रावेर तालुक्यातील नात्यातील पदवीधर युवतीशी विवाह निश्चित केला. हा विवाह शनिवारी रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील एका मंगल कार्यालयात सुरू होता. वरात विवाहस्थळाकडे येत असताना नवविवाहिता रावेर पोलिसांना घेऊन धडकली. तिने तिच्या विवाहाचे सबळ पुरावे व फोटो अल्बम दाखवून सर्वांना चकित केले. यानंतर मग पोलिसांच्या हस्तक्षेपाने हा विवाह रोखण्यात आला.याप्रकरणी नवविवाहितेने व नियोजित वधूच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली नसून नववधूच्या आईवडिलांनी झालेला खर्च नवरदेवाने अदा करावा, असा समाजपंचांनी निर्णय घेऊन या प्रकरणावर पडदा पाडण्यात आला.
दुसऱ्या लग्नाची बोंब अशी फुटली
पहिला विवाह झाल्यानंतर वराने दुसऱ्या विवाह करण्यापूर्वी झालेला त्याचा साखरपुडा झाला. ते फोटो नातेवाईक व मित्रमंडळींनी सोशल मीडियावर टाकले. आणि हेच फोटो पहिल्या पत्नीने बघितले आणि दुसऱ्या लग्नाची बोंब फुटली. तिने नियोजित वधूशी संपर्क साधत संपूर्ण माहिती देत हा विवाह थांबविण्याची विनंती केली. मात्र, नियोजित वधूचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. नवविवाहितेने थेट पुण्याहून रावेर गाठले आणि पतीचे दुसरे विवाहाचा डाव हाणून पाडला.