भाजपा बरोबर काँग्रेस जाणार नाही जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सर्वपक्षीय आघाडी बैठकीत काँग्रेसने भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्याने सर्वपक्षीय आघाडीची बैठक फिस्कटली आहे काँग्रेसने दोन पर्याय ठेवल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय आघाडी होणार नाही हे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे.
शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वपक्षीय आघाडी बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र काँग्रेसने आधीच भाजपा बरोबर न जाण्याची भूमिका स्पष्ट केली होती आजही बैठकीत त्यांनी भाजप जाण्यास तयार नसल्याचे सांगत पालक मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत एक जिल्हा वरती मध्यवर्ती बँकेचा साठी महा विकास आघडी तयार करावी नाहीतर कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे स्पष्ट जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आणि सर्वपक्षीय पॅनल मध्ये आमचा कोणताही संबंध नाही हे स्पष्ट केले.
दोन जागा मिळाल्या म्हणून नाराज असल्यावर जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले की आमची कोणतीही नाराजी नाही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. काँग्रेस पक्ष भाजपा बरोबर जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये जाऊ शकणार नाही त्यांना महाविकास आघाडी तयार करावी नाहीतर आम्ही स्वबळावर लढणार हे स्पष्ट केलं आहे.
जिल्ह्यात भाजपाचे दोन खासदार आहेत राजकारणात चढउतार होत असतात कोणत्या पक्षाची ताकद कोण ठरवणार कोणत्याही पक्षाची ताकद पक्ष ठरवू शकतो का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.