चाळीसगाव : प्रतिनिधी
७ वर्षीय मुलीला तुला घरी सोडून देतो असे म्हणत २९ वर्षीय तरुणाने तिला घरी सोडून न देतो एका दुसऱ्या जागेवर घेवून जात तिचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी एका विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत रहायला आहे. दि १२ मे रोजी मुलगी रेल्वे स्थानक परिसरात उभी असतांना याठिकाणी संशयित आरोपी आकाश पाटील (वय २९) हा याठिकाणी येत तुला घरी सोडून देतो असे म्हणत त्याच्या दुचाकीवर बसवून तिला शहरातील एका मैदानावर नेत भितींच्या आडोशाला नेत तिच्या सोबत चुकीचे कृत्य केले त्यानंतर मुलगी रडू लागल्याने त्याने मुलीला धमकी दिली कि जर हा घडलेला प्रकार जर तु कुणाला सांगितला तर तुला मारून टाकेल. त्यानंतर मुलीला तिच्या घराजवळ सोडून दिले. घडलेला प्रकार मुलीने आईजवळ सांगितला असता. मुलीच्या आईने लागलीच चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी आकाश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि.विशाल टकले हे करीत आहे. तर याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.