नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या आज मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. कर्नाटकाच्या रणसंग्रामात काँग्रेसने मुसंडी मारली असून 121 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपा 69 जेडीएस 26 इतर ८ तर महाराष्ट्र एकीकरण समिती सर्व जागांवर पिछाडीवर आहे. अद्याप निकालाची चित्र पूर्ण स्पष्ट झाले नसले तरी 50 जागांवर अटीतडीची काँग्रेस आणि भाजपा मध्ये लढत आहे. त्यामुळे कोणाचे बहुमत येणार हे अद्याप निश्चित नसल्याने सर्वांच्या धाकधूक वाढलेली आहे.
कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. यामध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. सध्या सुरवातीच्या कलांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि जेडी (एस) चे एचडी कुमारस्वामी यांनी आघाडी घेतलीये. याशिवाय, सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, निखिल कत्ती आघाडीवर असल्याचं दिसत आहेत.
काँग्रेस विजयी उमेदवारांना बेंगलोर मध्ये हलविणारा
कर्नाटक निवडणुकीचा निकाल अजून बाकी असून काँग्रेसकडून विजयी उमेदवारांना बेंगलोर मध्ये एका ठिकाणी आणण्याचे रणनीती सुरू केली आहे. भाजपाकडून घोडेबाजारीचे खेळी करून उमेदवार फोडण्याचे प्रयत्न होऊ शकता त्या दृष्टिकोनातून काँग्रेसकडून खबरदारी घेतली जात आहे.