रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय विवाहितेचा एका १८ वर्षीय तरुणाने विवाहितेला खोलीत नेत घाणेरडे कृत्य केल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शहरातील एका परिसरात २० वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ९ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास विवाहिता शौचास जात असताना एका संशयित आरोपीने विवाहितेला जबरदस्ती एका खोलीत नेट जबरदस्ती करीत तिच्या सोबत घाणेरडे कृत्य केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.संदीप दूनगहू हे करीत आहेत.


