• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाचोरा : भरधाव पिकअपने चौघांना उडवलं ; दोघांचे पाय निकामी !

editor desk by editor desk
May 12, 2023
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
पाचोरा : भरधाव पिकअपने चौघांना उडवलं ; दोघांचे पाय निकामी !

पाचोरा : प्रतिनिधी 

पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात भरधाव पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने रस्त्यालगत असलेल्या दत्त मंदिरासमोर बसलेल्या चौघांना उडवल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चार जणांपैकी दोन जणांचे पायाचे जागेवरच तुकडे पडून दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

भडगावकडून बुलढाण्याकडे एम.एच. ४८ बीएम. ७९४३ या क्रमाकांचे पिकअप वाहन जात होते. यादरम्यान वाहन पाचोरा शहरातून जात असताना वाहनावरील चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव वाहनाने रस्त्यालगत असलेल्या दत्त मंदिरासमोर बसलेल्या वसंत भाईदास पाटील, विनोद पाटील, अमोल वाघ आणि कुंदन परदेशी या चार जणांना जोरदार धडक दिली. या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात वसंत भाईदास पाटील (वय ४२, रा. सुरत), विनोद पाटील (वय ५०, रा. पाचोरा), अमोल वाघ (वय २७, रा. पाचोरा) आणि कुंदन परदेशी (वय, १७, रा. पुनगाव ता. पाचोरा) अशी जखमींची नावे आहेत. यात विनोद पाटील आणि वसंत पाटील या दोघांच्या दोन्ही पायांचे जागेवर तुकडे पडले होते.

अमोल वाघ आणि कुंदन परदेशी या दोन जणांना किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यावर पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना तात्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळाल्यावर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तसेच अपघातास कारणीभूत पिकअप वाहनावरील चालक आणि क्लिनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघात झाला त्यावेळी पहाटेची वेळ असल्याने मॉर्निक वॉकला जाणाऱ्या नागरिकांसह रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Previous Post

तरुणीला मारहाण करून दागिन्यांची पर्स लांबविणाऱ्याना घेतले ताब्यात !

Next Post

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात शनिवारपासून भरती प्रक्रिया !

Next Post

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात शनिवारपासून भरती प्रक्रिया !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group