जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका ३५ वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष देत एका ने फार्म हाऊसवर नेत तिच्यावर अत्यचार केल्या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्ण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेले मार्च २०२० पासून ते ८ फेब्रुवारी २०२३ पर्यत संशयीत आरोपी अंकुश मारुती महाजन (माळी) याने लग्नाचे आमिष दिले होते. या काळात फिर्यादी महिलेस संशयित आरोपीने ८ फेब्रुवारी रोजी एरंडोल ते जळगाव हायवे क्र.६ च्या बाजूला असलेल्या एका फार्म हाऊसवर फिर्यादीस दुचाकीने नेत महिलेवर शारीरिक संबध केल्याने पिडीत महिलेने एरंडोल पोलिसात धाव घेत संशयित आरोपी अंकुश महाजन(माळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.