मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाच्या निकालाची उत्सुकता वाढली असतांना एक मोठी बातमी समोर आ ली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालयाने नोटीस पाठवली आहे. सोमवारी १५ मे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस पाठवल्याचे समोर येत आहे.
आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात निकाल आहे. त्यातच गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.