मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप असलेले खासदार संजय राऊत हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या जमीनला ईडीने विरोध केला होता. त्यानंतर आज (10 मे) खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले होते. मात्र आरोपी सारंग आणि राकेश वाधवान आजही कोर्टात गैरहजर राहिले.
गुरूआशिष कंपनी ही दिवाळखोर घोषित झाल्यानं प्रकरण एनसीएलटी प्रलंबित असल्याचं आज कोर्टात स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे गुरूआशिषला आरोपी बनवण्यात आल्यानं त्यांची कोण जबाबदारी घेणार?, हे अद्याप स्पष्ट नाही. सारंग आणि राकेश वाधवान यांना कोर्टात हजर करण्यासाठी ईडीनं जेल प्रशासनाला विनंती केल्याची ईडीच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली. पुढील सुनावणीत सर्व आरोपींना कोर्टापुढे हजर करण्याचे तपासयंत्रणेला निर्देश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान संजय राऊतांनी आपला राजस्व पासपोर्ट नूतनीकरणासाठी परत करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज सादर केला आहे.