जिल्हा बँक निवडीसाठी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे याचे अर्ज दाखल
शिवसेनेचे आ किशोर पाटील , रा का चे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आ अनिल पाटील
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यास गती आली आहे यात एकनाथराव खडसे जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष रोहिणी खडसे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी अर्ज दाखल केले. जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय बैठकीत जागा वाटप ठरले असले तरी गुरूवारी दुपारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, (सहकार) यांनी दिली.निवडणूक कार्यक्रम लागला असला तरी आघाडी बाबत अजून काहीच चित्र स्पष्ट झाले नाही आहे.
संसर्ग प्रादूर्भावामुळे तब्बल वर्ष-दिड वर्ष लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होवू घातली आहे. या निवडणूकीसाठी सर्वपक्षीय बैठक होउन जागा वाटप ठरल्या असल्या तरी ऐनवेळी कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमधून सर्वपक्षीय पॅनलला अंतर्गत विरोध असला माजी मंत्री तथा संचालक एकनाथराव गणपत खडसे यांनी विकासो मुक्ताई गटातून २, ऍड. रोहीणी खडसे खेवलकर यांनी महीला राखीव गटातून २, तर विकासो मुक्ताईनगर गटातून २ असे ४ अर्ज, इतर संस्था गटातून रविंद्र बावस्कर यांनी २, विद्यमान व्हाईस चेअरमन तथा शिवसेनेचे आ. किशोर धनसिंग पाटील यांनी विकासो गट पाचोरा , भडगांव येथून अनु.जाती जमाती गटातून नथा भिवा अहिरे, राष्ट्रवादीेचे संजय पवार यांनी धरणगाव विकासो गटातून ३, यावल गटातून रामदास गोंडू पाटील, महिला राखीव मधून अरूणा रामदास पाटील, तिलोत्तमा पाटील, इमाव गटासह विकास गट भडगांव २ असे एकूण ३ अर्ज प्रताप हरी पाटील, इमा गटातून रोहीदास लाला पाटील, तिलोत्तमा पाटील, यांनी प्रत्येकी १, डॉ.सतीष भास्करराव पाटील २ , इतर संस्था गटातून गुलाबराव देवकर यांनी ३, विकासो गट पाचोरा येथून सतीष परशराम शिंदे यांनी ३, अनु जाती जमाती गटातून लिलाधर तायडे, विकासाो अमळनेर गट आअनिल भाईदास पाटील ४, महीला राखीव कल्पना शांताराम पाटील, इमाव सह इतर संस्था गटातून विकास मुरलीधर पवार यंानी प्रत्येकी १, विकासाो चोपडा गटातून घनःशाम ओंकारलाल अग्रवाल यांनी २, रविंद्र प्रल्हाद पाटील यांनी विकासो बोदवड गटातून ३ अर्ज, इमाव व इतर संस्था तून सुरेश सिताराम पाटील, महिला राखीव गटातून अरूणा दिलीपराव पाटील, इतर संस्था व इतर गट यातून संजय रामदास पाटील, महिला राखीव व इमाव गटातून संगीता विष्णू भंगाळे, विष्णू रामदास भंगाळे यांनी इमाव गटातून २, विष्णु महादू सोनार इतर संस्था गटातून २, विकासो चोपडा गटातून इंदिराबाई भानुदास पाटील यांनी २, महिला राखीव गटातून ३ असे ५, विकासो रावेर गटातनि अरूण पांडूरंग पाटील यांनी २, हरिषचंद्र वना पाटील यांनी इमाव गटातून १ सिमा शिवदास पाटील यांनी विकासो पाचोरा गटातून १ व महीला गटातून १, दिपकसिंग शांतीलाल राजपूत यांनी वि.जा. भ.ज गटातून १, इमाव गटातून प्रकाश जगन्नाथ पाटील, यांनी १, विकासो भडगांव गटातून १ व इमाव गटातून १ असे दोन अर्ज नानासाहेब बबनराव देशमुख, विकासो चोपडा गटातून रविंद्र काशिनाथ पाटील, विकासो रावेर गटातून जनाबाई गोंडू महाजन, मंदाकिनी राजेंद्र पाटील यांनी प्रत्येकी १, विकासो भडगांव गटातून हरिष सुरेश पाटील १, महिला राखीव गटातून कल्पना सतिष देवकर, इमाव गटातून सतिष चिंतामण देवकर, इमाव तसेच इतर संस्था गटातून शरद त्र्यंबक पाटील यांनी प्रत्येकी १, अनु.जाती जमाती गटातून महेंद्र बळीराम सपकाळे, विकासो जामनेर गटात नाना राजमल पाटील यांनी २, विकासेा एरंडोल गटातून अमोल चिमणराव पाटील यांनी ४, तर विकासो पारोळा गटातून चिमणराव रूपचंद पाटील यांनी दोन अर्ज असे ९२ अर्ज दाखल झाले आहेत.
एकूणच नवरात्रौत्सवाच्या नवव्या माळेनिमित्त जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अजार्ंचा पाउस पडला असून अजून १८ आक्टोबर पर्यत शेवटची तारीख आहे. राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूकींनंतर सत्ताबदल होउन त्याचे पडसाद महानगर पालिकेत भाजपाचे बहुमतातील सत्ता असूनही २९ नगरसेवक बाहेर पडून सत्तांतर झाले आहे. तशीच परिस्थिती जिल्हा बँकेतही दिसून येते कि काय असे चित्र दिसून येत आहे.