Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपच्या एका ट्विटने कर्नाटकातील निवडणुकीत मोठी खळबळ !
    राजकारण

    भाजपच्या एका ट्विटने कर्नाटकातील निवडणुकीत मोठी खळबळ !

    editor deskBy editor deskMay 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    कर्नाटकातील निवडणूकित भाजपने सर्वच शक्ती पणाला लावलेली असतांना  सोमवारी ८ मे संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. मात्र, भाजप मध्यरात्रीसुद्धा सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. मतदानाला एक दिवस बाकी असतानाच भाजपनं केलेलं मध्यरात्रीचे ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.

    प्रचार थांबल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी काल रात्री १२.२१ वाजता कर्नाटकच्या जनतेसाठी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे. ‘कर्नाटकला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारची गरज आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुमची स्वप्ने, ही माझी स्वप्ने आहे ती आपण आम्ही मिळून पूर्ण करू’. असं मोदींनी व्हि़डीओमध्ये म्हटले आहे.

    PM Shri @narendramodi's appeal to the voters of Karnataka. pic.twitter.com/lrXMuL7kHF

    — BJP (@BJP4India) May 8, 2023

     

    सध्या कर्नाटकातील जनतेने डबल इंजिन सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कारभार पाहिला आहे. भाजप सरकारची निर्णायक, केंद्रीत आणि भविष्यवादी धोरणे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनासारख्या महामारीनंतरही कर्नाटकातील भाजप सरकारच्या कार्यकाळात विदेशी गुंतवणूक आणि एफडी वार्षिक 90 हजार कोटी रुपयांवर आली होती, त्याचवेळी मागील सरकारच्या काळात हाच आकडा केवळ 30 हजार कोटी रुपयांच्या आसपास होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.