धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील मलाकली गल्ली,बेलदार गल्ली, पिल्लू मजिंद या भागासह धरणगाव शहरात गेले 22 दिवसापासून नागरिक पाण्या विणा हैराण झाले आहेत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलाचा हळदीकुंकू चा कार्यक्रमात १ एप्रिल पासून दोन दिवसा आड पाणी देवू असे म्हटले होते परंतु मे येऊन गेला तरी 22दिवसापासून पाणी नाही, तर तो एप्रिल फुलं होता का ? २४ साल चा एप्रिल महिणा होता हे तरी लोकांना सांगा?महिला मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत आहे.
आज अचानक या गल्लीतील महिलांनी नगरपालिकेला धडक दिली व मुख्याधिकारी व संबंधित कोणी भेटले नसता त्यांनी थेट शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना फोन केला व तातडीने पाच मिनिटांत आले, त्यांनी पवार साहेबांना फोन लावून टंचाईग्रस्त महिलांचा सम व्यथा मांडल्या व पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले,१५/२० दिवसांपूर्वी शिवसेनेचा शिष्टमंडळाने या बाबतीत लेखी निवेदन दिले,तरी सुद्धा अधिकारी या गोष्टी कडे दुर्लक्ष करीत असतील तर या गोष्टीला जबाबदार कोण? पालकमंत्री जबाबदार नसतील तर त्यांचे मतदारसंघात लक्ष नसेल, मंत्री मस्त, नागरिक त्रस्त असेच म्हणावे लागेल,प्रशासक असल्याने यांच्यावर अंकुश कोण ठेवणार ?तु माझ्याकडे पहा,मी तुझ्याकडे पाहतो असं बोबाट पणे सर्रासपणे चालले आहे. धरणगाव शहराचा पट्टी बांधलेल्या लोकांना जावू द्या पण सुजाण नागरिकांनी तरी याचा विचार करणे गरजेचे आहे. नगरसेवक जितेंद्र धनगर, विनोद रोकडे यांनी माहिलांना शांततेचे आव्हान केले.