लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ तालुक्यातीलसाकेगाव येथील तरूणाला खंडणी मागण्याच्या प्रकरणाती दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, महामार्गावर असणार्या बर्हाटे पेट्रोल पंपाजवळ बंटी पथरोड यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर फाडल्याच्या आरोप करत मयूर मदन काळे (वय १९, रा.साकेगाव) याचे संशयितांनी चारचाकीतून अपहरण केले. चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून ५ लाख रुपये खंडणी देण्याच्या अटीवर सोडून दिले होते. ७ व ८ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
या घटनेप्रकरणी मयूर मदन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी पथरोड, नितीन कोळी (अंजाळे, ता.यावल), हर्षल पाटील, गोलू जव्हेरीलाल कोटेचा (साकेगाव), ओम, सागन भगवान भोई (वय २८, रा.भोईनगर, भुसावळ) यांचेवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात प्रारंभी सागर भोई यास अटक करण्यात आली होती.
यानंतर काल नितीन वसंत तायडे (रा. अंजाळे, ता.यावल) व हर्षल सुनील पाटील (रा. वाल्मीक नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, अमोल पवार यांचेसह हवालदार रवींद्र बिर्हाडे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, नीलेश चौधरी, रमण सुरळकर, बंटी कापडणे, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश माळी यांनी कारवाई केली.