• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाने दाखविले लग्नाचे स्वप्न ; लग्नाच्या दिवशी तरूण ‘नॉटरिचेबल,

editor desk by editor desk
May 6, 2023
in क्राईम, राज्य
0
तरुणाने दाखविले लग्नाचे स्वप्न ; लग्नाच्या दिवशी तरूण ‘नॉटरिचेबल,

मुंबई : वृत्तसंस्था 

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक भागातील महिलासह तरुणीना सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसविण्याचे अनेक प्रकार बाहेर येऊ लागले आहेत. त्यातच एक प्रकार समोर आला आहे. मुंबईमधील सायन परिसरात राहणाऱ्या तरुणीची फेसबुकवरून एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तिने त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगविले. लग्नाची तारीखही ठरली. मात्र, लग्नाच्या तारखेलाच प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

सायन परिसरात तक्रारदार २५ वर्षीय तरुणी आजीसोबत राहते. २०१९ मध्ये तिची आसिफ नावाच्या तरुणासोबत फेसबुकवरून ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढला. त्याने तिला प्रेमाची गळ घातली. तरुणीनेही त्याला होकार दिला. दोघेही वडाळ्यात भेटले. त्यांच्यात गप्पा रंगल्या. भेटी वाढल्या. त्यानंतर मात्र आसिफने तिला लग्नाची मागणी घातली.

तो रोज तिला कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी तसेच घेण्यासाठी जात असे. त्यांच्यात जवळीक वाढली. दोघांमध्ये चार वर्षे चांगले प्रेमसंबंध होते. त्यानंतर मात्र जानेवारी २०२३ मध्ये तरुणीला शिवसेना कार्यालयात नोकरी मिळाली. त्यानंतर आसिफ तिला टाळू लागला. लग्नासाठीही नकार कळवला. नेमके काय झाले, या प्रकाराने तरुणीही गोंधळली. तिने त्याला मनवत लग्नाबद्दल घरी बोलण्यास सांगितले. त्यावर त्याने मला थोडा वेळ हवा आहे. योग्य वेळ आल्यावर बोलतो, असे तिला सांगितले. मात्र, दोघांमधील वाद वाढू लागले.
आसिफच्या वडिलांशी बोलणे झाल्यानंतर तो लग्नाला तयार झाला. न्यायालयात जाऊन त्यांनी लग्नासाठी १ मे तारीखही घेतली. ठरल्याप्रमाणे लग्नाचे स्वप्न रंगवत असताना १ मे रोजी आसिफ लग्नासाठी नकार कळवत ‘नॉट रिचेबल’ झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. दरम्यान, आरोपीला लवकरच पकडू अशी माहिती पोलिसांनी दिली असून त्यासाठी खास पथके नेमलेली आहेत.

Previous Post

पवार साहेबांचा राजीनामा मागे : जळगावात राष्ट्रवादीचा जल्लोष !

Next Post

फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टीका !

Next Post
फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टीका !

फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group