जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला, हा राजीनामा पवार साहेबांनी तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्तीनी मागणी केली होती तरी आज दी. ५ मे रोजी शरद पवार यांनी तमाम कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्ष्यात घेऊन तत्काळ दिलेला राजीनामा मागे घेतला व यापुढेही पवार साहेबच राष्ट्रस्वादी कांग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कायम राहणार अशी घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे फटके फोडून व पेढे वाटप करूज जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी माजी कृषी व परिवहन मंत्री गुलाबरावजी देवकर व प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , महानगरअध्यक्ष अशोक लाडवांजरी, युवक अध्यक्ष रिकूचौधरी , वाल्मिक पाटिल, कल्पनाताई पाटिल, सुनील माळी, सलीम इनामदार, किरण राजपूत, रमेश पाटिल, गौरव वाणी, अमोल कोल्हे , रहिम ताडवी , अनिल पवार , साहिल पाटिल,रफिक पटेल, खाल्लील शेख, आकाश हिवारे, संजय चव्हाण,ज्युबेर खाटीक, प्रमोद पाटिल , रमेश बहरे हितेश जावळे विशाल देशमुख , इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते.