इंदूर : वृत्तसंस्था
गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रियकराने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह चेंबरमध्ये टाकला होता. त्याने मृतदेहावर मीठ टाकून तो ब्लँकेटने झाकला होता. तीन वर्षांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. याप्रकणी हत्येशी संबंधित दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथे पोलिसांनी एका भंयकर हत्याकांडाचं गुढ उकललं आहे.
तीन मुलांचा बाप असेलला विशाल अर्चना नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर अर्चनाने विशालकडे लग्नासाठी तगादा लावला. याने त्रस्त झालेल्या विशालने एकदा अर्चनाला भेटायला बोलावलं. त्यानंतर विशालने अर्चानाचा तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. इतकंच नाही तर त्याने मृतदेह लपवण्यासाठी विशालने मित्रांची मदत घेतली.
सत्यनारायण आणि शिवनंदन या दोन मित्रांना विशालनं घरी बोलावलं. विशालनं मृतदेह घराच्या मागे बांधलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये टाकून त्यावर मीठ आणि ब्लँकेट टाकले. यानंतर त्याने चेंबर बंद केले. चेंबरमध्ये मृतदेह कुजावा आणि कोणाला त्याची कल्पनाही येणार नाही, असा विशालचा हेतू होता. पोलिसांसोमर ही ब्लाईंड केस होती. पोलिस याचा तपास करत होते. अखेर तीन वर्षांच्या सखोल तपासानंतर पोलिसांनी विशालच्या साथीदारांना अटक केली, तर विशालचा शोध सुरु आहे.२०२१ मध्ये परदेशीपुरा येथे रस्ता बांधकाम आणि नाला रुंदीकरणाचे काम सुरू होते. उत्खननात मुलीच्या शरीराचे काही भाग आणि सांगाडा सापडला होता. तेव्हापासून पोलीस सातत्याने ही केस सोडवण्यात गुंतले होते. परदेशीपुरा टीआय पंकज द्विवेदी यांनी सांगितले की, मुलीचे नाव अर्चना असून ती ६ मे २०२० पासून बेपत्ता होती. आरोपी विशाल प्रजापतीसह मित्र सत्यनारायण आणि शिवनंदन यांनी ही घटना घडवून आणली. आरोपी सत्यनारायण आणि शिवनंदन यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विशाल फरार आहे. तो अवैध दारू व्यवसायात गुंतला असून यापूर्वी तो तुरुंगात गेला आहे.चौकशीदरम्यान अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी विशालच्या पत्नीला अर्चनाच्या अफेअरची माहिती मिळाल्याची कबुली दिली. यानंतर विशालने आम्हाला अर्चनाला मारण्यास सांगितले. यानंतर अर्चनाचा गळा आवळून तिचा मृतदेह चेंबरमध्ये फेकून दिला.