२ मे रोजी राज्यातील राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचा गोप्यस्फोट शरद पवार यांनी केल्यानंतर असंख्य कार्यकर्ते आक्रमक होत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर आता पक्षाध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मात्र यावरून भाजपने राष्ट्रवादीला कोंडीत धरले आहे. शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करू नये अशी इच्छा राष्ट्रवादीसह ठाकरे गटाने केली असली तरी, भाजपकडूनही त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.
मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर मात्र भाजपने आता राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. पवार कुटुंबीय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बाहेरची कोणतीही व्यक्ती बसू देणार नाहीत, त्यामुळे पवार कुटुंबीय घराणेशाही चालवत असल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिले बोंडे यांनी केला आहे.
अनिल बोंडे म्हणले, राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही आहे, त्यामुळे ते एका कुटुंबाशिवाय ते दुसऱ्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होऊ शकतो. पण त्या त्या पक्षाची संस्कृती असते ती राष्ट्रवादीमध्ये आहे. माणसाला वयोमानानुसार व प्रकृतीनुसार मर्यादा असतात आणि हा सृष्टीचा नियम आहे. कोणामुळे कोणत्याच देशाचं, कोणत्याच राज्याचं,जनेतचं आणि कोणाचच, कोणामुळे काही विशेष फरक पडत नसतो.
थोड्या वेळापूरत ते निश्चित कमतरता जाणवेल परंतु नंतर लोकांना सवय पडून जाते. मी काही संजय राऊत नाही, की इतर पक्षात चाललेल्या घडामोडींवर मी प्रतिक्रिया द्यावी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतात ७५ वर्षानंतर व्यक्तीने वाणप्रस्ताश्रमामध्ये जावे. मात्र काही लोकांना एकादा माणूस माणूस हवाहवासा वाटत असला तरी त्याला निवृत्त होण्याचा अधिकार असतो आणि त्या दृष्टीने पाहायला गेले तर ती योग्यच गोष्ट असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.