जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातून जवळ असलेल्या शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष्य रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी, इसीजी व एक्स-रे च्या सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याला रुग्णालयातील तसेच बाहेरील रुग्णालयांचा रुग्णांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्याचा लाभ शेकडो सर्वसामान्य रुग्णांना होत आहे.
माजी मंत्री तथा रुग्णालयाचे संस्थापक गुलाबराव देवकर यांनी सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक गैरसोय टळावी, म्हणून आपल्या रुग्णालयात अत्यंत कमी दरात विविध सवलती उपलब्ध करून देण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार महागड्या समजल्या जाणाऱ्या सर्वसाधारण सिटीस्कॅनची सेवा केवळ 700 रुपये, तर जॉईंट सिटीस्कॅन 2100 रुपये, पोटाची कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन 2600 रुपये व मणक्यांचे थ्रीडी स्कॅन अवघ्या 1500 रुपयांत करण्यात येत आहे. सोनोग्राफीची सुविधा तीनशे रुपयांपासून पुढे उपलब्ध करून देण्यात आली असून, याचा गरोदर मातांना चांगला लाभ होत आहे. गरोदर मातांची पाचव्या महिन्यानंतरची सोनोग्राफी केवळ आठशे रुपयांत व ओबीएस डॉपलर सोनोग्राफी केवळ आठशे रुपयांत केली जात आहे.
याशिवाय ईसीजीची सुविधा अवघ्या 100 रुपयांत, तर एक्स-रे प्रतिकॉपी फक्त दीडशे रुपयात रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. देवकर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना या अत्यल्प दराचा फायदा तर होतच आहे, याशिवाय शहरातील इतर डॉक्टरांनी शिफारस केलेल्या रुग्णांकडून सिटीस्कॅन, सोनोग्राफी, इसीजी सारख्या सुविधांचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम
देवकर रुग्णालयात गेल्यावर्षीपासून आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या मोतीबिंदू मुक्त जिल्हा अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी रुग्णालयात केवळ 2500 रुपयात मोतीबिंदू व 6000 रुपयांत फेको शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या अभियानांतर्गत जिल्हाभरातून रुग्ण मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी देवकर रुग्णालयात येत आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना मिळालेली नवी दृष्टी त्यांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक बचत व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान यातच रुग्णालयाचे मोठे यश असल्याचे दिसून येत आहे.
सर्व योजना लागू
देवकर रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुषमान भारत व ESIC सह सर्व कंपन्यांच्या आरोग्य विमाधारकांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचाही लाभ शेकडो रुग्णांना होत आहे. रुग्णालयात उपलब्ध पंचतारांकित वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक उपकरणे व सेवाभावी तज्ञ डॉक्टरांची टीम यामुळे रुग्णांकडून देवकर रुग्णालयाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.