लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: क ब चौ उ म विद्यापीठ मध्ये बऱ्याच प्रकरणात अधिकारी वर्ग टाळाटाळ करण्याचे काम करीत असून काही लोक अधिकारी वर्गाला हाताशी धरून संगनमत करून जाणीव पूर्वक विद्यापीठात भ्रष्टाचार करत आहेत व विद्यापीठाची बदनामी करत आहेत त्याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल
करण्यात यावे असे निवेदन आज अँड कुणाल बी पवार, भूषण भदाणे, गणेश निंबाळकर, गौरव वाणी,चेतन चौधरी यांनी इमेल व्दारे राज्यपाल भगतसिंह कोश्यायरी कडे केली आहे.
आज विद्यापीठाच्या कारभाराबाबत राज्यपाल भगतसिंग कोशायरी ई-मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले यात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा मध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत यामुळे विद्यापीठाला बदनाम करीत आहे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या निवेदनामध्ये
1) आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू ह्यानी वेळेच्या आधी दबावाला कंटाळून पदाचा राजीनामा का दिला ? 2) आमच्या विद्यापीठ मधे कर्मचारी यांचे गणवेश काम …बाग काम ..साफसफाई ठेके … रद्दी साठी टेण्डर न काढता फायद्यासाठी विकलेली रद्दी …सुरक्षा रक्षक ह्यांचे भविष्य निर्वाह निधी भत्ते कपडे बूट त्यांच्या सुट्ट्यांमध्ये दिलेले जाणारे वेतन असे कोट्यवधी रुपए संगनमत करून अडकवून ठेवलेले पैसे त्यातून गरीब गरजू रोजंदारी कर्मचारी यांचे कष्टाचे पैसे मलिदा खाणारे निर्लज्ज लोक ह्याना काहीही शासन होत नाही .त्याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे .
3) विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयाला ओळख पाहून नियम बाह्य प्राध्यापक भरती तसेच गुणवत्ता नसताना त्याना दिलेली बढती तसेच ph D पदविका चेहरे पाहून आर्थिक हित पाहून दिलेल्या आहेत त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
4) विद्यापीठ मधे नवीन बांधकाम करताना दिलेले जाणारे टेण्डर हे एकच व्यक्तीला आर्थिक व्यवहार करून दिलेले गेले आहेत तसेच विद्यापीठ मधील रस्ता डांबरीकरण काम हे देखील त्याच पध्तीने वर्षानुवर्षे एकच ठेकेदार करत आहे त्याला कोणते अधिकारी अभय देतात ह्याबाबत चौकशी करावी.
5) पूर्ण जग भर कौरौना महामारी मधे कामकाज बंद असताना काही निव्रूत लोकाना विद्यापीठात बिले काढण्यासाठी बसवून UGC ची ग्रँड न येवू देता विद्यापीठ विकास निधी चा गैर वापर करून त्याना दिलेले लाखो रुपए याची चौकशी
6) विद्यापीठ मधे चौकशी समिती मधे असलेले निव्रूत न्यायाधीश त्यांच्या राजीनामा देताना विद्यापीठ परिसरात काय वातावरण आहे ह्याची चौकशी होऊन त्यानी राजीनामा का दिला ह्याचा खुलासा होणे बाबत
7) विद्यापीठात कायम स्वरूपी कुलसचिव नेमणूक करण्यासाठी केलेला कर्तव्यात कसूर
8) विद्यापीठ मधे रोजंदारी कर्मचारी सुरक्षा रक्षक बाग काम करणारे कर्मचारी यांची बिले काढण्यासाठी एका व्यक्तीच्या नावाने केलेले ठराव त्यावर कोणतेही कायदेशीर मत न घेताना ठेकेदाराला पैसे देताना जालेला गैर व्यवहार याची चौकशी
9) विद्यापीठ परिसरात प्रा भटकर यानी विद्यार्थिनी सोबत केलेले संभाषण व तिचा फोन द्वारे केलेला विनय भंग याची तीन वर्ष होऊन देखील चौकशी जाली नाही परंतु त्यात दोन चौकशी अधिकारी यानी दिलेले राजीनामे याची चौकशी
10) विद्यापीठ क्रुती समितीच्या कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन त्यानी देखील विद्यापीठ मधील ऑनलाईन परीक्षा घेतलेल्या बीलच्या चौकशीची मागणी म्हणजेच विद्यार्थी संघटना ह्यांच्या आरोपात असलेले तथ्य झूगारून सुरू असलेला भ्रष्टाचार याबाबत सखोल चौकशी होऊन तात्काळ प्रशासक नेमण्याची मागणी ह्या सर्व मुद्याचा आधार घेत आपण तात्काळ प्रशासक नेमून आमच्या क ब चौ उ म विद्यापीठ यास न्याय द्यावा कारण मागच्या कुलगुरू ह्यांच्या काळात शिल्लक असलेला विद्यापीठ विकास निधी व आता भ्रष्टाचार घोटाळा करून किती निधी शिल्लक आहे.
याचा तपशील देखील सर्वाना संकेत स्थळांवर दिसत आहे म्हणून आपणास विनंती की तात्काळ आमच्या विद्यापीठात प्रशासक यांची नियुक्ती करून आमच्या विद्यापीठात वातावरण पूर्व पदावर आणून विद्यार्थी वर्गाचे हित सांभाळून न्याय देवून आमचे विद्यापीठ वाचवावे तसेच विद्यापीठात होणारी कर्मचारी आंदोलन ह्याना न्याय द्यावा अशी मागणी अँड कुणाल बी पवार ,भूषण भदाणे गणेश निंबाळकर गौरव वाणी चेतन चौधरी यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना ईमेल द्वारे तक्रार केली आहे.