• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आरटीआयच्या माहितीत भगत बालाणी हेच गटनेते !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 12, 2021
in जळगाव, राजकारण
0
आरटीआयच्या माहितीत भगत बालाणी हेच गटनेते !

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मते  भाजपचे गटनेते भगत बालाणी

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महापालिकेत गटनेता पदावरून पेच निर्माण झाले असतानाच माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे अधिकृत गटनेते हे भगत बालाणी असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे गटनेते पदार भाजपचा हक्क असल्याचे भाजपा पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट  डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी केले.

आजच्या पत्रकार परिषदेत डॉ. राधेश्याम चौधरी यांनी महापालिकेतील सत्ताधारी आणि भाजपचे फुटीर सदस्यांवर टीका केली. आजवर आम्हाला ३० नगरसेवकांचा पाठींबा होता. यानंतर तीन जण सोबत आले. तर आज पुन्हा दोन जणांनी संमती दिल्यामुळे आता भाजपच्या ३५ सदस्यांनी संमतीने भगत बालाणी हेच भाजपचे गटनेते असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा डॉ. राधेश्याम चौधरी यांनी दिला.

भाजप पदाधिकारी अरविंद देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे माहितीच्या अधिकारात जळगाव महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदाबाबत विचारणा केली होती. यावर त्यांना काल अर्थात ११ ऑक्टोबर रोजी लेखी स्वरूपात उत्तर मिळाले असून यामध्ये भगत बालाणी हे भाजपचे गटनेते असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्याच्या महासभेच्या आधी आयुक्तांना आम्ही याबाबत माहिती दिली असून ही कागदपत्रे सुपुर्द केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तर बंडखोरांना अपात्र करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.

मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीत भाजपमध्ये उभी फूट पडली. यात ३० नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने जळगाव महापालिकेत सत्तांतर झाले. यात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी भाजपच्या फुटीर गटाचे कुलभूषण पाटील यांची वर्णी लागली. यानंतर दोन्ही गटांनी आपणच भाजपचा अधिकृत गट असल्याचे दावे केले आहेत. तसेच एकमेकांना आपत्र करण्यात यावेत असे तक्रारी अर्जदेखील केले आहेत.

मध्यंतरी झालेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीसाठी बंडखोर गटातर्फे गटनेते म्हणून दिलीप पोकळे तर प्रतोद म्हणून कुलभूषण पाटील यांच्या नावाने व्हीप बजावण्यात आले होते. याचे पालन केले नाही म्हणून या गटाने मूळ भाजपच्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी करणारी तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली होती. यावर निकाल देण्याआधी आयुक्तांनी गेल्या आठवड्यातच २७ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटीसा बजावल्या होत्या. यानंतर तीन नगरसेवकांनी घरवापसी करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता.

उद्याच महापालिकेची महत्वाची सभा होणार असतांना आज भाजपने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. या पत्रकार परिषदेला याप्रसंगी पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, जितेंद्र मराठे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, या प्रकरणी अरविंद देशमुख यांनी कागदोपत्री भक्कम पुरावे जमा करून भाजपच्या बंडखोर गटाला धक्का दिला आहे.

Previous Post

दुर्गम गावांमध्ये मासिकपाळी बद्दल जनजागृती-जिंदगी फाउंडेशनचा उपक्रम

Next Post

विद्यापीठात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; अँड कुणाल पवार यांची राज्यपालांकडे मागणी

Next Post
विद्यापीठात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; अँड कुणाल पवार यांची राज्यपालांकडे मागणी

विद्यापीठात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; अँड कुणाल पवार यांची राज्यपालांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group