मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली होती पण सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. तर गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे ४८९ नवे रुग्ण आढळून आले असून या प्राणघातक विषाणूमुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.
यासह, राज्यातील कोविड-19 (COVID-19) बाधित लोकांची संख्या आतापर्यंत 81,65,466 वर पोहोचली असून मृतांची संख्या 1,48,514 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे. रविवारी राज्यात 1126 जणांनी या साथीवर मात केली. यानंतर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या 80,12,873 झाली आहे. राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ४०७९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत