धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस सुरुवातीपासून तर शेवटपर्यत बघायला मिळाली अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार पॅनलचा धरणगावात डंका वाजला आहे.
धरणगाव बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर ठाकरे गटाचे नेते सुरेशनाना चौधरी, तसेच ठाकरे गटाची युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट या पद्धतीने बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावली होती.
धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर राष्ट्रवादीच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ सहा जागांवर विजय मिळवता आला आहे. एक हाती विजय मिळवल्यानंतर भाजप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. ढोल ताशाच्या गजरावर तसेच गुलाबाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळाले. धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाजप शिंदे गटाच्या सहकार सहकार पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केला आहे. भाजप शिंदे गटाला या ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार यांच्या गटाचाही पाठिंबा मिळाला होता. याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर धरणगाव बाजार समितीवर भाजप शिंदे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे.