• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे भाजपाने  दिले आयुक्तांना पत्र

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 12, 2021
in जळगाव, राजकारण
0
३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे भाजपाने  दिले आयुक्तांना पत्र

मनपात गटनेत्या पदावरून घडामोडींना वेग

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून आपल्याला ३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे पत्र भगत बालाणी यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे. यामुळे आता उद्या होणार्‍या महासभेतील घडामोडी रंजक वळणावर आल्याचे दिसून येत आहे.

१३ ऑक्टोबर रोजी महापालिकेची महासभा आयोजीत करण्यात आलेली आहे. यात स्थायी समिती सभापती, या समितीचे सदस्य आदींची निवड होणार आहे. या आधी राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. यात काही दिवसांपूर्वीच भाजपच्या तीन बंडखोर सदस्यांनी घरवापसी केली. यानंतर आता गटनेतेपदाबाबतची घडामोडी समोर आल्या आहेत. भगत बालाणी यांनी आपण स्वत: गटनेता तर राजेंद्र पाटील हे उपगटनेता असल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले असून यात आपल्याला ३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचा दावा केला आहे.

जळगाव शहर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्यावेळी बंडखोरी करून २७ नगरसेवकांनी भाजपच्या महापौर व उपमहापौर यांना मतदान न कराता शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करून पक्षादेश झुगारून मतदान केले आहे. याबाबत आपल्याकडे या २७ नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेचे अपिल दाखल आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

या बंडखोर नगरसेवकांनी मीटिंग घेतल्याचा बनाव करून भाजप गटनेता व उपगटनेता बदलाबाबतचे पत्र महापौर यांना दिले व महापौरांनी प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या कार्यालयाकडे पाठवले आहे; पण ते ग्राह्य धरू नये असे बालाणी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे. तर, दुसरीकडे विभागीय आयुक्तांनी भाजपच्या २७ सदस्यांना अपात्र का करू नये अशा आशयाच्या नोटीसा बजावल्या आहेत.

Previous Post

कृषी विभागाकडून अनुदानावर हरभरा बियाणे साठीचे परमीटचे वाटप होणार

Next Post

दुर्गम गावांमध्ये मासिकपाळी बद्दल जनजागृती-जिंदगी फाउंडेशनचा उपक्रम

Next Post
दुर्गम गावांमध्ये मासिकपाळी बद्दल जनजागृती-जिंदगी फाउंडेशनचा उपक्रम

दुर्गम गावांमध्ये मासिकपाळी बद्दल जनजागृती-जिंदगी फाउंडेशनचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !
क्राईम

खळबळजनक : तरुणीची छेड काढत तिघांनी लुटले !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group