Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पती कामावर गेल्यावर प्रियकर यायचा घरी अन असा झाला शेवट !
    क्राईम

    पती कामावर गेल्यावर प्रियकर यायचा घरी अन असा झाला शेवट !

    editor deskBy editor deskApril 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    पती कामावर जायचा, प्रियकरी घरी यायचा. शेजाऱ्यांना सगळं माहिती पडायचं. पतीला पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली. त्यामुळे तो आतल्या आत झुरत होता. एकेदिवशी पती घरी परतला तेव्हा त्याचा ३ वर्षाचा मुलगा रडत असल्याचे पाहिले. तर दुसरीकडे पत्नी तिच्या मोबाईलमध्ये चॅटिंग करण्यात गुंग होती. पतीने पत्नीचा मोबाईल हिसकावला आणि मेसेज वाचले तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने कैची उचलली आणि पत्नीच्या डोक्यात वार केले.

    पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पती बाहेर गेला आणि जोरजोरात ओरडत पत्नीच्या प्रियकराने तिच्यावर हल्ला केल्याचं बोलू लागला. हे कृत्य करून पती फरार झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत पत्नीला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारावेळी पत्नीचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी शाहू नगर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. हॉस्पिटलला पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासात प्रियकर नव्हे तर पतीनेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाले. ही घटना शुक्रवारी २६ एप्रिलला रात्री ११ वाजता घडली होती. आरोपी पती सुरेश विश्वकर्मा जो कारपेंटर आहे. रात्री उशीरा कामावरून घरी यायचा. शेजाऱ्यांनी त्याला सांगितले जेव्हा तू घरी नसतो तेव्हा एक व्यक्ती घरी येतो आणि खूप वेळ घरातच असतो. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी खाकी वर्दीचा हिसका दाखवताच आरोपीने पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.