पारोळा : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपसह शिंदे गट यांच्यात जोरदार लढत होत असतांना पारोळ्यातून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या बाजीमुळे आ.चिमणराव पाटील यांच्या होमस्पिचवरचा दारूण पराभव झाल्याचे चित्र दिसत आहे.
पारोळा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे १८ पैकी तब्बल १५ उमेदवार विजयी झाले आहेत. विकास सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल मापाडी मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. अद्याप मतमोजणी सुरू आहे, या बाजार समितीवर गेल्या अकरा वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांची सत्ता होती, विशेष म्हणजे बिनविरोध निवडून येत होते. यावेळी प्रथमच निवडणूक झाली. यात त्यांना पराभवचा सामना करावा लागला आहे. धक्कादायक म्हणजे आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. प्रारंभीच्या निकालात महाविकास आघाडी ८ तर भाजप शिंदे गट केवळ एका जागेवर विजयी झाले. रावेर बाजार समितीत एकूण अठरा जागा आहेत. त्यापैकी ९ जांगाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीने आठ जागा पटकाविल्या आहेत.