मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून पवार भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. त्यानंतर अनेक नेत्यांनी टीका टिपण्णी सुरु झाली आहे. यात आता राज्यमंत्री आठवले यांनी देखील मोठा दावा केला आहे.
अनेक नेत्यांची इच्छा आहे कि आपण मुख्यमंत्री व्हावे, अजित पवारांचीही आहे; पण ती सगळ्यांचीच पूर्ण होत नाही. पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लवकर मिळेल असे नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील, तर राज ठाकरेंना सोबत घेणे भाजपला देशपातळीवर परवडणारे नाही. माझा पक्ष आहे, तोपर्यंत राज ठाकरेंची आवश्यकता नाही, असा टोलाही श्री. आठवले यांनी लगावला. सांगलीकडे जाताना मंत्री आठवले आज दुपारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात अल्पवेळ थांबले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रामदास आठवले म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यात त्यांच्या कुटुंबीयांशी, शेतकऱ्यांशी भेटण्यासाठी आले होते.
त्यांच्यावर टांगती तलवार नसून, ती उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले नसते. संजय राऊतांच्या भूलथापांना बळी पडून ठाकरे राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी आमदारांची कामे केली नाहीत. त्यामुळेच शिवसेनेत महाबंड झाले. महायुती भक्कम आहे.’’