• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जनता यांना जोडे मारणार : मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार हल्लाबोल !

editor desk by editor desk
April 28, 2023
in राजकारण, राज्य
0
BIG Breking : २० रोजी जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : वृत्तसंस्था 

जोडे पुसायची लायकी असणारी लोकं सध्या राज्य चालवत आहेत. महाराष्ट्राचं पुढे काय होणार? मी मुख्यमंत्री असताना जे मला करता आले ते मी केले. परंतु ज्या पद्धतीने पाठीत खंजीर खुपसून माझे सरकार पाडले, त्यांचा बदला मी घेणारच, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेयांनी आज केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांची त्यांची जोडे पुसणारी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खूपच जिव्हारी लागली आहे. त्यांनी यावर आपल्या ट्विटमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे अशा लोकांना जनता आपल्या मतदानातून जोडे मारतील, असे जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

‘काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

‘जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

ट्विट केल्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली. ‘२०१९ला जोडे पुसायला कोण गेले होते? जोडे पुसायला गेले होते की जोडे धुवायला गेले होते? हे लोकांना माहिती आहे. हे सर्वसामान्याबद्द द्वेष, मस्तर आहे. चहावाला, टपरीवाला, रिक्षावाला, भाजीवाला हे सर्वसामान्य लोक जेव्हा राजकीय नेतृत्व करायला लागतात तेव्हा अशा लोकांना पोटदुखी होते. सर्वसामान्य माणूस हा जोडे पुसरणारा मेहनती, प्रामाणिक असतो. तुमच्यासारखा विश्वासघातकी नसतो. त्यामुळे अशाप्रकारचा माजोरडापणा करणाऱ्यांना जनता नक्की मतदानातून उत्तर देईल, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.

“उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. पण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तात्काळ भूमिका बदलली. याच्यामागचं कारणल काय याचा जनतेने शोध घेतला पाहिजे. ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. ही भूमिका वारंवार घेतली जाते. समृद्धी हायवेच्या बद्दलही अशीच भूमिका होती. पण त्याला गेमचेंजर प्रकल्प आम्ही केला. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नावही दिलं. बारसूचा प्रकल्प सर्वसामान्यांना विश्वासात घेऊनच नागरिकांच्या हितासाठी केला जाईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Previous Post

जळगाव : घरातून १७ वर्षीय मुलीला पळविले !

Next Post

मी बदला घेणार ; ठाकरेंचा थेट शिंदेंना इशारा !

Next Post
“राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या!”

मी बदला घेणार ; ठाकरेंचा थेट शिंदेंना इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group