भर उन्हाळ्यात नेते तापले तर उमेदवार होतोय फितूर
धरणगाव – एरंडोल बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार संभ्रमात
विजय पाटील – राजकीय विशेष: शेतकरीचा आत्मा असलेली निवडणूक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणूकीत दोन ही पॅनलकडून एकमेकांना आव्हान देण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. यासाठी दोन्ही पॅनलचे नेते भर उन्हात दिवसभर प्रचारासाठी मैदान तुफान फटकेबाजी करतांना दिसून येत आहे. पण सायंकाळी मात्र त्यांचेच उमेदवार गावागावात फिरून पॅनलसाठी मत न मागता ‘कारे भो मनावर ध्यानं ठेवजो बाकी कोणले भी दे…’ असे चित्र एरंडोल-धरणगावात चर्चा सुरु झाली आहे.
जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या धडाक्यात सुरु होती. आज सर्व प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. निवडणुकीसाठी धरणगाव तालुक्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, राष्ट्रवादीचे संजय पवार, भाजपाचे पी.सी.पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनल तर महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल हे सुरेश नाना चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात लढत आहे हे सारे नेते भर उन्हात दिवसभर मैदानावर सभा गाजवत एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करून बाजारपेठेत आपले पॅनल कसे निवडूण येईल याचे गणित रात्री आखत आहेत मात्र त्यांच्या पॅनलचे काही उमेदवार काही गावात फिरुन पॅनलसाठी मत न मागता मला एक मत देशील बाकी कुणालाही दे, असे विनवनी करतांना काही ठिकाणी आढळून आल्याने मतदारांमध्ये हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. येत्या रविवार दि 28 रोजी हे मतदान होणार आहे. यंदाच्या बाजार समिती कोण राखते याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागून आहेत.