उपद्रव हा खूनापेक्षा जास्त वाईट आहे-पवित्र कुराण
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून नागरिकांना ठार मारल्याचा निषेधार्थ जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी च्या रविवारी झालेल्या तातडीच्या सभेत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
उप द्रविना इस्लाम मध्ये थारा नाही पवित्र कुराण मधील सूर ए अलमायदा आयत ३२ मध्ये स्पष्ट नमूद आहे की ज्याने एखाद्या माणसाला खूनाबद्दल अथवा पृथ्वी तलावर उपद्रव पसरविण्या व्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानव जातीला जीवन प्रदान केले.
इस्लाम मधील सहिष्णुता नैसर्गिक रीतीने आपले कार्य करणारे कायदे असूनही इस्लाम आपल्या अनुयायांना इतरांशी वागताना शांतताप्रिय, सामान्य जणाची वागताना जास्तीत जास्त सहिष्णुता बाळगण्याची शिकवण देतो.
धार्मिक मतभिन्नता ही पटवली पाहिजे आणि तिचा आदर केला पाहिजे याबाबत पवित्र कुराण मध्ये सुर ए बकरा आयात क्रमांक २५६ मध्ये स्पष्ट आहे की
धर्माच्या बाबतीत कोणावरही जोर जबरदस्ती नाही तर सूर ए अनाम आयात क्रमांक १०८ मध्ये नमूद हे की अल्लाह खेरीज ज्या देव-देवतांची ते पूजा करतात त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नका.
म्हणून आत्मविश्वासाने म्हटले जाऊ शकते की
इस्लाम दहशतवादाचे समाजातून उच्चाटन करू इच्छितो आणि सर्व प्रकारच्या धमक्या आणि विध्वंसा पासून त्याला मुक्त करू इच्छितो म्हणूनच पवित्र कुराण अशी घोषणा करतो कि सर्व इमान धारकांनी शांततेस पात्र बनावे, त्यांनी शांततेची तळी उचलून धरावी आणि शांतता टिकवावी आणि त्यात कसल्याही दृष्ट पणाची भेसळ होऊ देऊ नये. शुद्ध ईमान हे निखालस शांतता गृहीत धरते
सदर आशयाचा ठराव मा जिल्हाअधिकारी जळगांव यांचे मार्फत भारत सरकार चे महा माहिम राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाठवण्यात येईल व दोषी व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाईची नागणी करण्यात येणार असल्याचे बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख, महा नगर अध्यक्ष सैयद चाँद यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.
सभेत यांची होती उपस्थिती
फारूक शेख,सैयद चाँद,युसूफ इसा, सलीम मोहम्मद,इस्माईल फकिरा, अकिल पठाण,अल्ताफ हुसेन, सैयद मुख्तार, तय्यब शेख,जुलकर नैन, रिझवान हरीश, ताहेर शेख,हारून शेख आदींची उपस्थिती होती.